तुषार नाईक यांचा भाजपातर्फे सत्कार

महाराष्ट्र राज्य शासनाचे लोककला अनुदान शिफारस समिती सदस्य म्हणून सिंधुदुर्ग दशावतार चालक मालक बहुउद्देशीय संघाचे जिल्हाध्यक्ष आणि वेंगुर्ला येथील नाईक मोचेमाडकर पारंपरिक दशावतारी लोकनाट्य मंडळाचे संचालक तुषार नाईक यांची महाराष्ट्र राज्य शासनाच्या राज्य सांस्कृतिक पुरस्कार समितीवर सदस्य म्हणून निवड करण्यात आली. त्याबद्दल भाजपाच्यावतीने मोचेमाड येथे तुषार नाईक यांच्या घरी जाऊन त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी भाजपाचे प्रसन्ना देसाई, सुहास गवंडळकर, बाबली वायंगणकर, पपू परब, मोचेमाड ग्रामपंचायत सदस्य नारायण गावडे, किसान मोर्चाचे सत्यवान पालव, बाबल नाईक उपस्थित होते. तुषार नाईक यांच्या निवडीबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्यासह महाराष्ट्र व गोव्यामधून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Close Menu