सनदी अभियंता विवेक कुबल व कुबलवाडा मित्रमंडळ पुरस्कृत व गाडीअड्डा मित्रमंडळ आयोजित नरकासूर स्पर्धा घेण्यात आल्या. यात लहान गटात प्रथम-कुबलवाडा मित्रमंडळ, द्वितीय-बागायतवाडी बॉईज, तृतीय-आई सातेरी मित्रमंडळ व शाब्दिक गुन्हेगार मित्रमंडळ वेंगुर्ला, उत्तेजनार्थ- टीम पॅन्थर केपादेवी तर मोठ्या गटात प्रथम-आई केळबाई मित्रमंडळ कुडाळ, द्वितीय-बेधकड रॉकस्टार गिरपवाडा, तृतीय-धोकमेश्वर सातेरी क्षणभर विश्रांती मित्रमंडळ पाटीलवाडा, उत्तेजनार्थ-गाडीअड्डा मित्रमंडळ व कांबळीवाडा मित्रमंडळ-उभादांडा यांनी पटकाविला. स्पर्धेचे परिक्षण महेंद्र मातोंडकर, मयुरी केरकर, सुरेश कौलगेकर व सत्यवान साटेलकर यांनी केले. तर बक्षिस वितरण सनदी अभियंता विवेक कुबल, गाडीअड्डा मित्रमंडळाचे राजन केरकर, अमित म्हापणकर, समिर म्हापणकर, भाऊ मांजरेकर, महेश कुर्ले, प्रसाद मांजरेकर, छोटू कुबल यांच्या उपस्थितीत झाले.