बेळगाव येथे संपन्न झालेल्या इंटिग्रेटेड सोशल वेल्फेअर सोसायटी, नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाऊंडेशनच्या राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये अणसुर गावचे सरपंच सत्यविजय गावडे यांना त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन ‘आदर्श सरपंच पुरस्कार‘ देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्ष लिमये, कोल्हापूरचे माजी महापौर राजेश शिंगाडे, कर्नाटक पोलीस महासंघ अध्यक्ष अरविंद गट्टी, उपजिल्हाधिकारी कोल्हापूर रोहिणी शिंदे, बाळूमामा देवस्थान आदमापूरचे प्रशासक रनचार्ज यांच्यासह संस्थेचे संचालक, संस्थापक व अध्यक्ष उपस्थित होते.