बेरोजगारी मुक्त जिल्हा बनवण्यासाठी संधी द्या – नारायण राणे

             सिंधुदुर्गात उद्धव ठाकरे आले आणि टीका करून गेले. विकासाबाबत मात्र त्यांनी एक शब्दही काढला नाही. केसरकर राणे यांच्यावर फक्त टीका. मतदारांनी हे लक्षात ठेवावे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात लायकी नसलेले बाहेर चे लोक येऊन टपकले आहेत. ते स्वतःशी प्रामाणिक नाहीत ते चुकून निवडून आले तर तुमच्या बरोबर प्रामाणिक राहतील का हा खरा प्रश्न आहे. ज्यांनी कधी कोणाला स्वखर्चाने मदत केली नाही आणि एक जण पैशाच्या जोरावर उभा राहिला आहे, त्याला हा पैसा कुठून आणला ते विचारा, बोलती बंद होईल. त्यामुळे या मतदारसंघाच्या विकासासाठी दीपक केसरकर यांना चौथ्यांदा आशीर्वाद रुपी मतदान करा आणि महायुतीला सत्तेत पाठवा. येणाऱ्या पाच वर्षात समृध्द आणि बेरोजगारी मुक्त जिल्हा बनवण्यासाठी संधी द्या असे आवाहन भाजप नेते खासदार नारायण राणे यांनी वेंगुर्ले येथे बोलताना केले.
सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, आरपीआय महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांच्या प्रचारार्थ खासदार नारायण राणे यांची आज वेंगुर्ला येथील स्वामिनी मंगल कार्यालयात जाहीर सभा पार पडली. यावेळी स्टार प्रचारक म्हणून उद्योगमंत्री उदय सामंत, विधानसभेचे उमेदवार दिपक केसरकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी, भाजप युवामोर्चा प्रदेश उपाध्यक्ष लखमराजे भोसले, संदिप कुडतरकर, भाजपा महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगांवकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, शिदे सेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, जिल्हा संघटक सुनिल डुबळे, भाजप तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, भाजप महिला तालुकाध्यक्ष सुजाता पडवळ, माजी जि.प.अध्यक्ष समिधा नाईक, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य शरद चव्हाण, शिदेसेना तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, शहरप्रमुख उमेश येरम, युवासेना जिल्हाप्रमुख हर्षद डेरे, तालुकाप्रमुख स्वप्नील गावडे, उपजिल्हाप्रमुख सचिन देसाई, कोस्टल विभाग तालुकाप्रमुख काशिनाथ नार्वेकर, उपजिल्हाप्रमुख सुहास कोळसुलकर, उपतालुकाप्रमुख सलील नाबर, महिला तालुका संघटिका दिशा शेटकर, महिला शहर संघटक अॅड.श्रद्धा बाविस्कर, माजी नगरसेविका श्रेया मयेकर, निलेश सामंत, वंदना किनळेकर, अजित पवार राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष प्रज्ञा परब, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष संदिप पेडणेकर, आरपीआय तालुकाध्यक्ष विलास राठये आदी उपस्थित होते.
सिंधुदुर्गातील युवा पिढी अमली पदार्थांकडे वळते आहे हे धोकादायक नारायण राणे पुढे म्हणाले की, सिंधुदुर्गातील युवा पिढी अमली पदार्थांकडे वळत आहे. हे भविष्यासाठी धोकादायक आहे. आपल्या जिल्ह्यात पर्यटन वाढले पाहिजे पण नको त्या गोष्टी आम्ही खपवून घेणार नाही. या प्रकारांमध्ये कोण आहेत ते लवकरच बाहेर पडेल. मी पोलीस विभागाशी बोललो असून कारवाईबाबत सूचना केल्या आहेत. गोव्यातून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ सिंधुदुर्गात येतात. महाविद्यालयाच्या बाहेर त्यांचे एजंट उभे राहतात. आणि आपली युवा पिढी बरबाद करण्याचे काम सुरू आहे. असले प्रकार थांबवण्यासाठी आणि या भागाच्या विकासासाठी सुसंस्कृत आणि शांत उमेदवाराची गरज आहे. तीन टर्म दीपक केसरकर यांनी अनेक विकासात्मक कामे केली आहेत. त्यामुळे त्यांना चौथ्यांदा संधी द्या महायुतीच्या माध्यमातून उर्वरित विकास कामे आम्ही मार्गी लावू.
ऊबाटाचे उमेदवार राजन तेली आणि अपक्ष उमेदवार विशाल परब हे काही करू शकत नाही. विशाल परब याने कधी सरपंच निवडणूकही लढवली नाही आणि थेट आमदारकीची स्वप्न पाहत आहे. केवळ पैशाच्या जोरावर पदे मिळत नसतात. लोकांसाठी काम करावे लागते. विरोधकांच्या भुलथापांना बळी न पडता मतदारांनी महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन नारायण राणे यांनी केले.
आडाळी एमआयडीसी मध्ये ५० ते १०० प्रकल्प औषध पुरवणारे कारखाने येणार : उद्योगमंत्री उदय सामंत
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केसरकर यांचे अॅडव्हान्समध्ये विजयी अभिनंदन केले. त्यानंबर बोलताना म्हणाले की, महायुतीचा विजय ही काळ्या दगडावरची रेघ आहे. कुणीही जरी आडवे आले तरी राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली तुम्ही त्यांना नेस्तनाबुत करू शकता एवढा आत्मविश्वास मला आहे. मी स्वतः मंत्री असल्यामुळे दिपकभाईंचे कामकाज अगदी जवळून बघतो. राज्याच्या प्राथमिक शिक्षकांना असेल, राज्याच्या शालेय शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना असेल आजपर्यंत राजकीय जीवनात ख-या अर्थाने न्याय देण्याचे काम दिपक केसरकर यांनी केले आहे. ही वस्तुस्थिती आहे आणि ती आपल्या सर्वांना माहिती आहे. या मतदारसंघाचे वातावरण वेगवेगळ्या पद्धतीने करण्याचे प्रयत्न काही लोक करीत आहेत आणि म्हणून मी मुद्दाम वेंगुर्लावासीयांना विनंती करायला आलो आहे. कारण मी देखील वेंगुर्लेकरच आहे. आपण सर्वांनी एकगठ्ठा मतदान राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली दिपकभाईंना करावे. रत्नागिरीहून वेंगुर्ल्यात यायला अडीच तास लागतात. ही विकासाची मुहुर्तमेढ नारायण राणे मुख्यमंत्री असताना रोवली गेली. त्यानंतर या मतदार संघाचा विकास झाला तो फक्त आणि फक्त दिपक केसरकर यांनी केलेला आहे. औषध पुरवणारे जे कारखाने आहेत, त्यांची बैठक संपन्न झाली. भविष्यात आडाळी एमआयडीसी मध्ये ५० ते १०० प्रकल्प औषध पुरवणारे कारखाने येणार आहेत. त्यामुळे सिधुदुर्गासह वेंगुर्ल्यातील हजारो बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे. आम्ही विकासाचा आणि रोजगाराचा विचार केला आहे. दिपक केसरकर यांना निवडून देणे ही जनतेची नैतिक जबाबदारी आहे. काल आलेल्या नेतेमंडळींनी विकासाबाबत न बोलता नारायण राणे, दिपक केसरकर यांच्यावर टीका करण्याचे काम केले आहे. कोणीही कितीही वल्गना केल्या तरी त्याचा काडीमात्रही परिणाम दिपकभाईंवर होणार नाही. ही जागा महायुतीचाच उमेदवार निवडून येणार आहे आणि त्यासाठी आपणा सर्वांची साथ हवी असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Close Menu