63 व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत सिंधुदुर्ग केंद्रातून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा मालवण या संस्थेच्या ‘ओऍसिस’ या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच सातार्डे मध्यवत संघ, कवठणी या संस्थेच्या ‘गावय’ या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालक श्री. बिभीषण चवरे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे. या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे.
सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे सिंधुदुर्ग केंद्रावरील अन्य निकाल पुढीलप्रमाणे-
सिध्दांत फाऊंडेशन, सिंधुदुर्ग या संस्थेच्या ‘तुम्हाला काय वाटतं?’ या नाटकासाठी तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. दिग्दर्शनः प्रथम पारितोषिक हेमंत कदम (नाटक-ओऍसिस), द्वितीय पारितोषिक रुपेश कवठणकर (नाटक- गावय), प्रकाश योजना प्रथम पारितोषिक शाम चव्हाण (नाटक ओऍसिस), द्वितीय पारितोषिक – केदार सामंत (नाटक- द कॉन्शन्स), नेपथ्य: प्रथम पारितोषिक राजू रेगे (नाटक- गावय), द्वितीय पारितोषिक श्रीराज बांदेकर (नाटक ओऍसिस), रंगभूषा प्रथम पारितोषिक संजय जोशी (नाटक- गावय), द्वितीय पारितोषिक प्रथमेश सामंत (नाटक ओऍसिस) उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक रविंद्र हळदणकर (नाटक- गावय) व शुभदा टिकम (नाटक ओऍसिस), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे ईशा माळकर (नाटक- तनमाजोरी), वैभवी सोकटे (नाटक- श्याम तुझी आवस इली रे), रुपाली परब (नाटक- तुम्हाला काय वाटतं ?), कीत सांगळे (नाटक- मुक्काम पोस्ट भोकरवाडी), प्रसाद खानोलकर (नाटक-तुम्हाला काय वाटतं ?), प्रा. प्रदीप होडावडेकर (नाटक- सूर्यास्त), चतुर पार्सेकर (नाटक- चार बापांचा मुलगा), मिलिंद कासार (नाटक- मिशन 59)
01 डिसेंबर, 2024 ते 13 डिसेंबर, 2024 या कालावधीत नाटककार मधुसूदन कालेलकर बहुउद्देशिय सभागृह, वेंगुर्ला व मामा वरेरकर नाट्यगृह, मालवण येथे अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण 12 नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्री. चंद्रकांत अत्रे, श्री. विजय रावळ आणि श्रीमती मृणालीनी (मंजुषा) जोशी यांनी काम पाहिले.
सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. विकास खारगे यांनी पारितोषिक प्राप्त संघांचे तसेच इतर पारितोषिक प्राप्त कलाकारांचे अभिनंदन केले असून भविष्यातही या संघांनी व कलाकारांनी सर्वोत्तम कामगिरी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे
वेंगुर्ले केंद्रावरील आठही नाटके हाऊसफुल्ल
या स्पर्धेतील आठ नाटके वेेंगुर्ले येथील मधुसुदन कालेलकर नाट्यगृहात तर चार नाटके मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृहात सादर झाली. गतवषप्रमामणेच याही वष वेेंगुर्लेतील सर्वच्या सर्व नाटके हाऊसफुल्ल झाल्याने समन्वयक संस्था म्हणून काम पहाणाऱ्या माझा वेेंगुर्ला संस्थेचे विशेष कौतुक नाट्यरसिकांतून झाले. मधुसुदन कालेलकरची आसन क्षमता 650 एवढी आहे. पहिल्या दिवशी सादर झालेले कलावलयच्या चार बापांचा मुलगा या नाट्यप्रयोगाला 750 तर श्याम तुझी आवस इली रे व सूर्यास्त या नाट्यप्रयोगाला 800 प्रेक्षकांनी हजेरी लावली.