आधार फाऊंडेशन, सिधुदुर्ग व वेंगुर्लेकर इंटिग्रेटेड अॅण्ड रिसर्च सेंटर वेंगुर्लातर्फे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. याचे उद्घाटन वेंगुर्ला तहसीलदार ओंकार ओतारी यांच्या हस्ते झाले. रक्तदान चळवळ सिधुदुर्ग जिल्ह्यात जोमाने वाढत आहे. ही गोष्ट गौरवास्पद आहे. वेंगुर्ल्यात रक्तपेढी व्हावी ही आधार फाऊंडेशनची मागणी रास्त आहे. ती होण्यासाठी जी शासकीय मदत लागेल ती देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही तहसीलदार ओतारी यांनी दिली. यावेळी मुख्याधिकारी परितोष कंकाळ, उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.संदिप सावंत, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नीलगे, बालरोगतज्ज्ञ डॉ.प्रल्हाद मणचेकर, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. राजेश्वर उबाळे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्यामराव काळे, निवृत्त गटशिक्षणाधिकारी रमेश पिगुळकर, आधार फाऊंडेशनच्या अध्यक्ष माधुरी वेंगुर्लेकर, उपाध्यक्ष किरण वेंगुर्लेकर, सचिव अॅड.नंदन वेंगुर्लेकर, खजिनदार डॉ.वंदन वेंगुर्लेकर, सदस्य सगुण मातोंडकर, वैदेही वेंगुर्लेकर, कावेरी वेंगुर्लेकर, अॅड.शैलेश नाबर यांसह सामजिक कार्यकर्ते उपस्थित होते.