महाराष्ट्र बॉडीबिल्डर असोसिएशन आयोजित ६२वी ‘महाराष्ट्र श्री २०२५‘ या मानाच्या स्पर्धेसाठी सिधुदुर्ग बॉडीबिल्डर्स अससिएशनच्यावतीने श्री सातेरी व्यायाम शाळा वेंगुर्ला येथे सिधुदुर्ग जिल्हा निवड चाचणी घेण्यात आली. यात सिधुदुर्ग जिल्हा संघाची निवड करण्यात आली आहे. यामध्ये ५५ ते ६० किलोमध्ये प्रथमेश कातळकर (माणगांव), ६० ते ६५ किलोमध्ये रोहित कुरमुळे (कुडाळ), ऋषिकेश कोडीयल (सावंतवाडी), ६५ ते ७० किलोमध्ये बाळा नार्वेकर (कुडाळ), सलमान त्यागी (सावंतवाडी), ८० ते ८५ किलोमध्ये संदेश सावंत यांचा तर संघ व्यवस्थापक म्हणून सुधीर हळदणकर (सावंतवाडी) व संघ प्रशिक्षक अमोल तांडेल (वेंगुर्ला) यांचा समावेश आहे. या निवड समितीमध्ये किशोर सोन्सुरकर, आंतरराष्ट्रीय पंच अमोल तांडेल, राज्य पंच सुधीर हळदणकर, राज्य पंच स्टेज मार्शल म्हणून अंकित सोन्सुरकर यांनी काम पाहिले.