क्रीडा व युवकसेवा संचालन महाराष्ट्र राज्य जिल्हा क्रीडा परिषद अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिधुदुर्ग आणि कोकण सिधू पॉवरलिफ्टींग सिधुदुर्ग व शेठ म.ग.हायस्कूल देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय पॉवरलिफ्टींग क्रीडा स्पर्धेत वेंगुर्ला येथील नाईक जिम अॅण्ड फिटनेस सेंटरच्या खेळाडूंनी यश प्राप्त केले. यात १७ ते १९ वर्षाखालील गटात ५३ किलो वजनी गटात गौरवी मांजरेकर (ब्राँझ मेडल), ७२ किलो वजनी गटात अस्मि थला (गोल्ड मेडल), ६६ किलो वजनी गटात समर राणे (गोल्ड मेडल), ५३ किलो वजनी गटात जासम खुल्ली (ब्राँझ मेडल), ५३ किलो वजनी गटात देवेंद्र तुळसकर (गोल्ड मेडल), ५९ किलो वजनी गटात वसंत राणे यांचा समावेश आहे. तसेच देवेंद्र तुळसकर, अस्मी थला व समर राणे या तिघांचे राज्यस्तरीय पातळीवर निवड करण्यात आली आहे. या सर्वांना नाईक जिम अँड फिटनेस सेंटरचे ट्रेनर ईश्वर माने यांचे मार्गदर्शन लाभले.