वेंगुर्ला नगरपरिषद हद्दीत आमदारांचा स्थानिक विकास कार्यक्रम सन २०२३-२४मधून निधीस प्रशासकीय मान्यता मिळालेल्या व कांही कारणामुळे काम थांबलेल्या आडीपुल-भटवाडी येथील गणेश घाटाचे ठिकाणी १० फेब्रुवारी रोजी शिवसेनेचे शहर प्रमुख उमेश येरम यांनी स्थानिकांशी या विकास कामाबाबत चर्चा केली. या चर्चेअंती तेथील ग्रामस्थांचा कामाबाबतचा गैरसमज दूर झाल्याने साडेसात लाखाचे ते काम करण्यास स्थानिक ग्रामस्थांनी सहमती दर्शविली. यावेळी श्याम कौलगेकर, प्रितम सावंत, विद्या सावळ, नवनाथ सातार्डेकर, नितीन तेली, मनोज पारकर, संदेश रगजी, जितेंद्र तुळसुलकर, दत्तात्रय गावडे यांसह अन्य नागरीक उपस्थित होते.