कोकणातील अद्वितीय वनस्पतींपैकी एक मॅमिया सुरिगा ज्याला स्थानिक भाषेत सुरंगी म्हणतात. परफ्यूम उद्योगात सुरंगी फुले वापरली जातात. सुरंगी फुलांचा सुगंधित वृक्ष कोकणच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचा मानला जातो. या मोहक फुलाचा उपयोग केवळ अत्तर उद्योगासाठीच नाही तर धार्मिक विधीमध्ये, देवतांना वाहण्यासाठी, स्त्रियांना गजरा माळण्यासाठी आणि रोजच्या जीवनात विविध प्रकारे केला जातो. याच सुरंगीचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी निवांता हॉस्पिटॅलिटीज सिंधुदुर्गने वेंगुर्ला तालुक्यातील आसोली गावात 15 फेब्रुवारी ते 15 एप्रिल पर्यंत सुरंगी फेस्टिवल 2025 चे आयोजन केले आहे.
पहिल्या दिवशी सकाळी 9 पासून कोकम सरबत, बेलसरबत यासारख्या स्थानिक सरबताने स्वागत आणि सुरंगीच्या झाडांमध्ये विसावा. फुलं व कळ्या गोळा करण्याचा अनुभव, नाश्त्यामध्ये गरमागरम आंबोळी, घावणे, शिरवाळे आदी पारंपरिक पदार्थांचा आस्वाद. इच्छुक व्यक्तींना स्वयंपाकात सहभागी होऊन आपल्या कुटुंब व मित्रांसाठी पदार्थ तयार करण्याची संधी. स्थानिक कलाकारांची भेट, रांगोळी कलाकार, बांबू किंवा दोरखंड हस्तकला करणारे, शिल्पकार किंवा लोककलाकार यांच्याशी प्रत्यक्ष भेट आणि गप्पा गोष्टी. दुपारी 1 वा. स्थानिक ताज्या भाज्यांसह, गावरान कोंबडी किंवा समुद्रातील स्वादिष्ट मासे, पारंपरिक मसाल्यांमध्ये तयार केलेले जेवण, दुपारच्या विश्रांतीनंतर 4 वा. चहा, कॉफी व स्नॅक्सनंतर समुद्रकिनारी फेरफटका किंवा सागर स्नान. सायं. 6 पारंपरिक आठवणीतील कोकणी खेळांचा आनंद, रात्री 9 शेकोटीभोवती किंवा जेवणाच्या टेबलवर ग्रिल्ड पदार्थांसह गरमागरम जेवण, रात्री कोकणातील स्थानिक गूढ गोष्टी ऐकण्याचा रोमांचक अनुभव सोबत रानातली सफर शांत झोपेसाठी हळद व औषधी वनस्पतींयुक्त गरम दुधाचा आस्वाद, दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजता चहा-कॉफी घेऊन सुरंगी फुलं व कळ्या गोळा करण्यासाठी पक्ष्यांचा मधुर किलबिलाट ऐकत शेतात जाण्याचा अनुभव. स्थानिकांसोबत गजरा बनवण्याची कला शिकण्याची संधी, सकाळी 7 वा. खाडीतील कांदळवन बोट सफर, समुद्री वनसंपदा जाणून घेण्याचा अनोखा अनुभव, 11 वाजता पारंपरिक शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. या नव्या उपक्रमासाठी प्रतिव्यक्ती रु. 2850 एवढे शुल्क आकारण्यात येईल.15 व्यक्ती असल्यास दहा टक्के सवलत आहे. संपर्क- जितेंद्र-9860052383, जॉर्ज- 9765410717