वेताळ प्रतिष्ठान सिंधूदुर्ग तुळस आयोजित सलग अकराव्या वष घेण्यात आलेल्या खुल्या चित्रकला व रंगभरण स्पर्धेला जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सुमारे 225 पेक्षा जास्त मुलांनी या चित्रकला स्पर्धेमध्ये सहभाग घेतला.
यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर, सचिव प्रा. डॉ. सचिन परुळकर, महेश राऊळ, मंगेश सावंत, सद्गुरू सावंत, सुधीर चुडजी, प्रदीप परुळकर, प्रसाद भणगे, माधव तुळसकर, प्रमोद तांबोसकर, यशवंत राऊळ, सचिन गावडे, किरण राऊळ आदी उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षण सुप्रसिद्ध चित्रकार वामन तुळसकर आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते गणेश कुंभार यांनी केले. अगदी बालवाडीपासून अशा स्पर्धा घेणे म्हणजे मुलांच्या योग्य वयात कौशल्याचा शोध घेणे होय. यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणाऱ्या वेताळ प्रतिष्ठानचे आम्ही ऋणी आहोत, असे प्रतिपादन वामन तुळसकर यांनी केले. तर चित्रकलेची विविध अंगे आणि चित्रकलेचे महत्त्व याविषयी गणेश कुंभार यांनी मार्गदर्शन केले.
या स्पर्धेतील निकाल पुढीलप्रमाणे आहे. रंगभरण स्पर्धा- (बालवाडी गट) प्रथम- रचित अमरेश सातोसे (वरवडे, कणकवली), द्वितीय- ग्रीष्मा तुकाराम डुंबरे (श्री दत्त विद्यालय, तुळस), तृतीय- शुभ्रा मनोजकुमार ठुंबरे (जि.प. शारदा तुळस), उत्तेजनार्थ रुद्र शैलेश नेमळेकर (सिंधुदुर्ग विद्यानिकेतन), उत्तेजनार्थ- अस्मी अजय बर्डे (जि. प. शारदा विद्यालय).
रंगभरण स्पर्धा- (गट पहिली ते दुसरी): प्रथम- हर्षा भालचंद्र थवी (जि. प. आंदुर्ले नं. 1), द्वितीय- राही दिगंबर मोबारकर (एम. आर. देसाई), तृतीय- सिया रमेश गावडे (जि. प. वेंगुर्ला नं. 1), उत्तेजनार्थ- प्रथम शान्वी मिलिंद होडावडेकर (होडावडे नं.1), उत्तेजनार्थ- आराध्या मंदार राऊळ (वेंगुर्ला नं.1).
चित्रकला स्पर्धा-(तिसरी चौथी) प्रथम- वरद किरण ताम्हणकर (मऊ कणकेवाडी), द्वितीय- भूमी संतोष रेडकर (सिंधुदुर्ग विद्यानिकेतन), तृतीय- पवन भालचंद्र थवी (आंदुर्ले न. 1), उत्तेजनार्थ- प्रथम ज्ञानेश्वरी प्रवीण तांडेल (तुळस फातरबाडा), द्वितीय प्रांजल रमेश गावडे (वेंगुर्ला नं.1),
चित्रकला- (पाचवी ते सातवी) प्रथम- काशिनाथ तेंडुलकर (जि. प. मठ नं.1) द्वितीय- सान्वी मंगेश चुडजी (शिवाजी हायस्कूल तुळस), तृतीय- आर्यन सुभाष ठुंबरे (शिवाजी हायस्कूल तुळस), उत्तेजनार्थ- विजया भगवान मांजरेकर (शिवाजी हायस्कूल तुळस), समर्थ संदीप मेस्त्री (केंद्रशाळा वेतोरे नं.1).
चित्रकला (आठवी ते दहावी) प्रथम-सिद्धी भरत गावडे (सिंधुदुर्ग विद्यानिकेतन), द्वितीय- राशी योगेश सातोसे (कुडाळ), तृतीय- स्नेहल मंगेश चुडजी (सिंधुदुर्ग विद्यानिकेतन), उत्तेजनार्थ प्रथम- केतकी संतोष रेडकर (सिंधुदुर्ग विद्यानिकेतन), उत्तेजनार्थ द्वितीय- वेदिका गंगाराम मोर्ये (जनता विद्यालय, तळवडे).
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कुंदा सावंत, विधी नाईक, सानिया वराडकर, प्रज्वल परुळकर यांनी मेहनत घेतली. सूत्रसंचालन प्रा. डॉ. सचिन परुळकर यांनी तर आभार महेश राऊळ यांनी मानले.