कै.सौ.शुभदा अविनाश शेणई बालवाडीचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व स्नेहसंमेलन २७ फेब्रुवारी रोजी साई मंगल कार्यालय येथे संपन्न झाले. उद्घाटन सामाजिक कार्यकर्त्या मनाली दाभोलकर यांच्या हस्ते झाले. यावेळी मानसी गावडे, महेश गावडे, उदय मालवणकर, रूपाली हरमलकर, वैभव मालवणकर, शिवज्ञा चिचकर, सचिता करंगुटकर, भटवाडी शाळा नं.१चे शिक्षक विश्वनाथ जगताप आदी उपस्थित होते. विविध स्पर्धा, परीक्षांमध्ये यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. त्यानंतर मुलांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. मान्यवरांचे स्वागत बालवाडीच्या संचालिका रिषा सावळ यांनी केले. तर सूत्रसंचालन आणि आभाराचे काम नितीश कुडतरकर यांनी पाहिले.