रूग्ण साहित्य केंद्राला रूग्णोपयोगी साहित्य प्रदान

कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्यावतीने सामाजिक कार्यकर्ते दयानंद कुबल यांच्याकडून ३० हजार ९७५ रूपये किमतीचा जंबो ऑक्सिजन सिलेंडर, ऑक्सिजन फ्लो मिटर, स्पॅनर, ट्राॅली आदी साहित्य वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस अंतर्गत कार्यरत असलेल्या कै.आशा पुरूषोत्तम पाटणकर रूग्ण साहित्य सेवा केंद्र यांना भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी कोकण कला व शिक्षण विकास संस्था दयानंद कुबल, संस्थेचे मुंबई मुख्य कार्यालय प्रमुख साक्षी पोटे, वेताळ विद्यामंदिरचे मुखाध्यापक हरमलकर, प्रथमेश सावंत, प्रिती पांगे आदी उपस्थित होते. यावेळी दयानंद कुबल यांचा वेताळ प्रतिष्ठानतर्फे शाल-श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन विवेक तिरोडकर यांनी तर आभार महेश राऊळ यांनी मानले.

 

 

Leave a Reply

Close Menu