मुलांच्या क्षमतेनुसार त्यांना विविध उपक्रम द्या!-प्रा.बहाळकर

बदलत्या जीवनशैलीत जुन्या शिक्षणपद्धतीने आपली मुलं प्रगती साधू शकणार नाहीत. प्रत्येक मुलाची क्षमता वेगवेगळी असते त्यानुसार वेगवेगळे उपक्रम मुलांना दिले पाहिजेत. मेंदूच्या वाढीसंदर्भात सुरांची जादू विलक्षण असते. कर्णकर्कश गोंगाटाचे प्रत्यय देणारे संगीत जाणीवपूर्वक टाळायला हवे असे प्रतिपादन प्रा.राजेंद्र बहाळकर यांनी केले.

      वेंगुर्ला येथील मुक्तांगणतर्फे मुलांच्या संगोपनात ‘संगीत आणि खेळाचे महत्त्व‘ यावर पालक कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत प्रा.राजेंद्र बहाळकर यांनी आपल्या ओघवत्या शैलीत विविध खेळनृत्यपथनाट्य याद्वारे पालकांशी हसतखेळत संगीतनृत्यखेळ आणि आपली मुलं यांचा सुरेख संगम साधला. पालकांनी प्रश्न विचारून शंकांचे निरसन केले. मुक्तांगणच्या सुजाण पालक केंद्रातर्फे प्रा.बहाळकर यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी मुक्तांगणच्या सहशिक्षिका निलांगी करंगुटकरगौरी माईणकर यांनी विशेष परिश्रम घेतले. तर आपल्या संवेदनाजाणीवा जीवंत ठेवणे पालक आणि माणूस म्हणून अत्यंत महत्त्वाच्या कशा आहेत हे सांगणारे गीत मुक्तांगणच्या संचालिका मंगल परूळेकर यांनी सादर केले. समिर प्रभूखानोलकर यांनी आभार मानले.   

Leave a Reply

Close Menu