आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती महिला आघाडी शाखा वेंगुर्ला मार्फत ‘सन्मान नारी शक्तीचा‘ हा उपक्रम घेण्यात आला होता. या उपक्रमा अंतर्गत वेंगुर्ला तालुक्यातील दोन कर्तृत्ववान तसेच बिकट परिस्थितीमध्ये आपल्या कुटुंबाचा सांभाळ करणा-या स्त्रियांचा सन्मान करण्यात आला. शाल, श्रीफळ व पोस्टाचे बचत पत्र (१३ हजार) आणि रोख रक्कम एक हजार असे या सन्मानाचे स्वरूप होते.
वेंगुर्ला शहरातील राणी लक्ष्मी कन्याशाळा येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमावेळी व्यासपिठावर वेंगुर्ला शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष सिताराम नाईक, जिल्हा सचिव तुषार आरोसकर, पतपेढीचे माजी अध्यक्ष नारायण नाईक, शिक्षण विस्तार अधिकारी रामचंद्र कोनकर, जिल्हा कोषाध्यक्ष कालिदास खानोलकर, शिक्षक पतपेढी वेंगुर्ला शाखा संचालक सिताराम लांबर, शिक्षक समिती जिल्हा सल्लागार त्रिबक आजगावकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जयेश मांजरेकर, माता पालक उपाध्यक्षा श्रीम.नेरूरकर आदी उपस्थित होते.सत्कारमूर्तींच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा केलेला स्तुत्य असल्याचे मत तुषार आरोसकर यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी तालुका सरचिटणीस प्रसाद जाधव, तालुका प्रवक्ता किरण मुडशी, विभागीय अध्यक्ष रामा पोळजी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य स्मिता तांडेल, तालुका सहसचिव ज्ञानेश्वर हरमलकर, सुप्रिया भाटकर, स्नेहा परब, सीमा तुळसकर, गणेश आजबे, सचिन ठाकरे, मारूती गुडुळकर, विशाल जाधव, मुग्धा कनयाळकर, अर्चना रेडकर, मेदिनी रेडकर, मेघा पवार, नीना मार्गी, समृद्धी पेडणेकर आदी शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋतिका राऊळ, प्रास्ताविक महिला आघाडी तालुका सचिव नेहा गावडे, तर आभार महिला आघाडी वेंगुर्ला महिला नेत्या प्रतिमा पेडणेकर यांनी मानले.