राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवात दिया मालवणकर द्वितीय

श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्ट, सावर्डे-चिपळूण यांनी डेरवण येथे आयोजित किलेल्या डेरवण युथ गेम्स २०२५ या राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवात वेंगुर्ला येथील जागृती क्रीडा मंडळाची खेळाडू तथा वेंगुर्ला हायस्कूलची विद्यार्थिनी दिया मालवणकर हिने लांब उडी व उंच उडी प्रकारात द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. जागृती मंडळाचे अध्यक्ष दिलीप मालवणकर व संदीप पेडणेकर यांचे तिला मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल वेंगुर्ला हायस्कूलचे मुख्याध्यापक पी.डी.कांबळे व विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून तिचे कौतुक होत आहे.

Leave a Reply

Close Menu