शिदे सेनेच्या वेंगुर्ला शहर महिला संघटनेतर्फे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या महिलांसाठीच्या विविध कार्यक्रमांचे उद्घाटन शिदे सेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्या हस्ते झाले. यावेळी शहर प्रमुख उमेश येरम, तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात दत्तराज नर्सरी व दत्तराज कॅश्यू फॅक्टरीच्या संचालिका उर्मिला येरम, योग प्रशिक्षका साक्षी बोवलेकर, उत्कृष्ट सेवा देणा-या आरोग्य सेविका विनिता तांडेल, महिला बचत गट प्रमुख स्वाती बेस्ता यांचा सन्मान करण्यात आला.
मनोरंजनाच्या खेळात प्रथम क्रमांक प्राप्त साक्षी परब यांना एलईडी ३२ इंची टीव्ही, द्वितीय क्रमांक प्राप्त सुहानी परब यांना गॅस शेगडी, तृतीय क्रमांक प्राप्त सेजल भाटकर यांना मिक्सर, तर उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त पूजा भुरे व समिधा रेडकर यांना प्रत्येकी प्रेशर कुकर अशी बक्षिसे देण्यात आली. मान्यवरांचे स्वागत उपशहर महिला संघटक मनाली परब व शहर अल्पसंख्यांक महिला संघटक शबाना शेख यांनी केले तर सूत्रसंचालन व आभाराचे काम शहर महिला प्रमुख अॅड.श्रद्धा बाविस्कर-परब यांनी पाहिले. महिलांसाठीच्या मनोरंजन खेळाचे निवेदन शुभम धुरी यांनी केले. या कार्यक्रमास महिलांकडून उस्फूर्त प्रतिसाद लाभला.