लेखनातून हिदी भाषा समृद्ध करा!

हिदी प्रचार सभा वेंगुर्ला या संस्थेचा ६९वा वर्धापनदिन व स्पर्धा पुरस्कार वितरण समारंभ ५ एप्रिल रोजी नगरवाचनालयाच्या सभागृहात संपन्न झाला. यावेळी व्यासपिठावर आसोली हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक रमण किनळेकर, हिदी प्रचार सभा वेंगुर्ल्याचे अध्यक्ष का.हु.शेख, कार्याध्यक्ष विशाखा वेंगुर्लेकर, कार्यवाह महेश बोवलेकर, निवृत्त हिदी शिक्षिका अ.ग.खानोलकर, नगर वाचनालय संस्थेचे कार्यवाह कैवल्य पवार, साहित्यिक वीरधवल परब, उभादांडा न्यू इंग्लिश स्कूलचे शिक्षक मधुकर कुबल आदी उपस्थित होते.

      राष्ट्रभाषा विकसित करण्यासाठी विद्यार्थ्यांनी हिदी भाषेतून आपले विचार मांडले पाहिजेत. तसेच लेख, काव्य, कथा लेखन करून भाषा समृद्ध केली पाहिजे. हिदी भाषेच्या समृद्धीसाठी हिदी प्रचार सभा अनेक उपक्रम करतात व त्यात माध्यमिक व प्राथमिक शाळेतील शिक्षक, विद्यार्थी बहुसंख्येने सहभागी होतात ही बाब सुद्धा उल्लेखनीय असल्याचे सांगत हिदी प्रचार सभेच्या भवनासाठी आपले सहकार्य राहील असे आश्वासन रमण किनळेकर यांनी दिले.

      हिदी प्रचार सभेकडून घेण्यात आलेल्या प्राथमिक विभागातील शुद्धलेखन, अनुवाद, कथाकथन व काव्यगायन तसेच माध्यमिक विभागातील शुद्धलेखन, निबंध, वक्तृत्व व काव्यगायन स्पर्धेतील विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तर सेवानिवृत्त हिदी शिक्षिका अ.ग.खानोलकर यांचा सन्मान करण्यात आला.

      विशाखा वेंगुर्लेकर यांनी प्रास्ताविकात हिदी प्रचार सभेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. का.हु.शेख यांनी हिदी प्रचार सभेची आरंभापासून ते आजपर्यंतची स्थिती सांगून हिदी प्रचार सभा भवनाच्या निधी उपलब्धतेसाठी आवाहन केले. सूत्रसंचालन व आभार प्रा.महेश बोवलेकर यांनी मानले. यावेळी विद्यार्थी, शिक्षक, पालक, प्रा.नंदगिरीकर उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu