वेंगुर्ला येथील सरस्वती शिशूवाटिकेचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि बक्षिस वितरण समारंभ ६ एप्रिल रोजी येथील नगरवाचनालय संस्थेच्या सभागृहात उत्साहात संपन्न झाले. शिशूवाटीकेतील लहान मुलांनी सादर केलेले विविध सांस्कृतिक कार्यक्रम दाद देऊन गेले.
या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी व्यासपिठावर माजी सैनिक राजेश हिरोजी, योग शिक्षिका साक्षी बोवलेकर, आंबा बागायतदार अनिकेत वेर्णेकर, शिक्षणप्रेमी स्वाती गावडे आदी उपस्थित होते. शिशू वाटिकेच्या संचालिका दिप्ती मांजरेकर – उडीयार यांनी मान्यवरांचे स्वागत केले. तर मान्यवरांच्या हस्ते मुलांना बक्षिस वितरण करण्यात आले. त्यानंतर मुलांचे एकापेक्षा एक असे विविध गुणदर्शनपर कार्यक्रम संपन्न झाले. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतामध्ये मुलांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन मेघा घाडी हिने केले. यावेळी पालक, शिक्षणप्रेमी आणि हितचितक उपस्थित होते.