जिल्हा पत्रकार संघाशी संलग्न असलेल्या वेंगुर्ला तालुका समितीसह अन्य ८ तालुका पत्रकार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जिल्हा पत्रकार संघाने जाहीर केला आहे. त्यानुसार वेंगुर्ला येथील लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीच्या सभागृहात वेंगुर्ल तालुक्याची पुढील दोन वर्षासाठीची कार्यकारिणी निवडण्यात आली. यात अध्यक्षपदी दिपेश परब यांची बहुमताने तर उपाध्यक्षपदी रविकिरण परब व योगेश तांडेल, सचिवपदी विनायक वारंग, सहसचिवपदी समीर गोसावी आणि खजिनदारपदी प्रदीप सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सल्लागार म्हणून दाजी नाईक, मॅक्सी कार्डोज यांचा तर कार्यकारणी सदस्य म्हणून प्रथमेश गुरव, अजय गडेकर, भरत सातोस्कर, संदीप चव्हाण, सीताराम धुरी, संदेश राऊळ, अनिल निखार्गे यांचा समावेश आहे. निवडणूक निरीक्षक म्हणून जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य बाळ खडपकर व राजन नाईक यांनी काम पाहिले.
मावळते अध्यक्ष मॅक्सी कार्डोज यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या कामकाजाबाबत गौरवोद्गार काढत समाधान व्यक्त केले. नूतन अध्यक्ष दिपेश परब यांनी अध्यक्षपदी संधी दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले, तसेच सर्वांना विश्वासात घेऊन काम केले जाईल असे स्पष्ट केले.