वेंगुर्ला आगारातून वेंगुर्ला-परळ ही बस २१ एप्रिलपासून नियमित चालू करण्यात आली असल्याची माहिती वेंगुर्ला आगार व्यवस्थापक राहूल कुंभार यांनी दिली. सदर गाडी मठ हायस्कूल, कुडाळ तिठा, वेतोरे तिठा, कुडाळ, कसाल, कणकवली, तरेळे, राजापूर, लांजा, पाली, संगमेश्वर, चिपळूण, महाड, माणगांव, पेण रामवाडी, पनवेल, मैत्री पार्क, सायन, दादर मार्गे जाणार आहे. ही गाडी वेंगुर्ला आगारातून सायंकाळी ५ वाजता तर परळवरून सायंकाळी ४.३० वाजता सुटेल. रा.प.महामंडळाच्या सर्व सेवा प्रकारातील बसेसद्वारे ७५ वर्षावरील सर्व प्रवाशांना मोफत प्रवास करता येईल. तर महिला प्रवासी सन्मान योजनेंतर्ग महिला प्रवाशांना सर्व सेवा प्रकारातील बसेसद्वारे ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे.