वेंगुर्ला येथील प्रतिथयश व नामांकित वकील अॅड. नारायण उर्फ श्याम जनार्दन गोडकर यांची नुकतीच भारत सरकारच्या नोटरीपदी नियुक्ती झाली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. सिधुदुर्ग व वेंगुर्ला येथे वकिली करणाया अॅड. गोडकर यांनी जिल्हा वकील संघटनेचे माजी उपाध्यक्ष, वेंगुर्ला तालुका वकील संघटनेचे माजी अध्यक्ष व उपाध्यक्ष अशी पदे भूषविली आहेत. गेली ३८ वर्षे आपल्या अशिलांना न्याय मिळवून देणारे सर्वसामान्य जनतेचे वकील म्हणून त्यांची विशेष ख्याती आहे. वकिली क्षेत्रासोबतच सामाजिक कार्यातही ते अग्रेसर असून सध्या सिधुदुर्ग भंडारी महासंघाचे विद्यमान सदस्य व वेंगुर्ला भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.