वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग व श्री देवी सातेरी महिला मंडळ, तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने व सीपीएए मुंबई, व्हिजन हॉस्पिटल गोवा यांच्या सहकार्याने आयोजित मोफत महाआरोग्य व नेत्र तपासणी शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सुमारे ३१९ रूग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली. उत्सव मंगल कार्यालयात घेतलेल्या या शिबिराचे उद्घाटन सरपंच रश्मी परब यांच्या हस्ते झाले. यावेळी अणसूर सरपंच सत्यविजय गावडे, पाल सरपंच कावेरी गावडे, तुळस उपसरपंच सचिन नाईक, ग्रा.पं.सदस्य जयवंत तुळसकर व नारायण कुंभार, प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर, सातेरी महिला मंडळाच्या अध्यक्षा सुजाता पडवळ आदी उपस्थित होते. महाआरोग्य तपासणी शिबिरात सीपीएए मुंबई यांच्या सहकार्याने विविध तपासण्या करण्यात आल्या. याचा १५८ जणांनी लाभ घेतला. तर व्हिजन हॉस्पिटलचे प्रमुख आणि गोवा विधानसभा आमदार डॉ.चंद्रकांत शेट्ये यांच्या विशेष सहकार्याने १६१ नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले, उद्योजक दादासाहेब परूळकर, उद्योजक सुधीर झांट्ये तसेच भाजपाचे तालुकाध्यक्ष पप्पू परब यांनी भेट देऊन शिबिराचे कौतुक केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी आनंद तांडेल, सागर सावंत, महेश राऊळ, प्रदीप परूळकर, सद्गुरू सावंत, सुधीर चुडजी, प्रज्वल परूळकर, सचिन गावडे, अनिल परूळकर, मंगेश सावंत, आशिष पडवळ, सानिया वराडकर, विधी नाईक, वैष्णवी परूळकर, जान्हवी सावंत, अदिती तांबोसकर, हेमलता राऊळ, नाना राऊळ, माधव तुळसकर, केशव सावंत व सातेरी मंडळाच्या महिलांनी मेहनत घेतली. सूत्रसंचालन प्रा.डॉ.सचिन परूळकर यांनी केले.