महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री यांच्या निर्देशानुसार २३ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व बसस्थानकांवर ‘हिदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे‘ स्वच्छ, सुंदर बसस्थानक हे अभियान राबविण्यात येत आहे. हे अभियान स्पर्धात्मक स्वरूपात असून उत्कृष्ट बसस्थानकांना रोख बक्षिस देऊन गौरविण्यात येईल. मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती अशा ६ प्रादेशिक स्तरावर व एकत्रित अंतिम स्पर्धा राज्यपातळीवर आयोजित करण्यात आली आहे.
या अभियानांतर्गत वेंगुर्ला बस स्थानकाचे सर्वेक्षण करण्यात आले. बस स्थानकात असणाया सेवा सुविधा, स्वच्छता यांसह अन्य बाबींची पाहणी केली. यावेळी रत्नागिरी विभागीय वाहतूक अधिक्षक शंकर यादव, विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी राजेश्वर जाधव, सर्वेक्षण समिती पत्रकार सदस्य भरत सातोस्कर, प्रवासी मित्र राधाकृष्ण वेतुरकर या चार सदस्यीय समितीने बसस्थानक इमारत व परिसराची पाहणी करून मूल्यांकन केले. यावेळी आगार व्यवस्थापक राहुल कुंभार, वाहतूक निरीक्षक विशाल देसाई, सहायक वाहतूक निरीक्षक श्री. सासोलकर, शिरोडा बस स्थानक वाहतूक नियंत्रक लालसिंग पवार आदी उपस्थित होते.