श्री रामसीतेच्या मूर्तीची पुनःप्राणप्रतिष्ठापना संपन्न

वेंगुर्ला येथील श्री देव रामेश्वर मंदिर परिसर सुशोभिकरण कार्याअंतर्गत श्री रामेश्वराच्या कौलप्रसादाप्रमाणे नवीन मंदिरात श्री रामसीता देवतांच्या मूर्तींची पुनःप्राणप्रतिष्ठापना कार्यक्रम २२ व २३ मे रोजी संपन्न झाला. दि.२२ रोजी गणेश पूजन आणि पुण्याहवाचनासह धार्मिक विधी तर दि.२३ रोजी देवस्थान मानकरी यांच्या हस्ते तसेच देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी आणि भाविकांच्या उपस्थितीत नूतन बांधण्यात आलेल्या मंदिरावर शिखर कलशारोहण करण्यात आले. त्यानंतर मंदिरात श्रीराम सीता यांची पुनःप्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.

Leave a Reply

Close Menu