रविद्र सामंत यांना ‘कुटुंब प्रमुख‘ तर सौ. स्वरूपा सामंत यांना ‘जिजामाता‘ पुरस्कार

कुडाळदेशस्थ आद्य गौड ब्राह्मण युवक मंडळ, श्री मठ संस्थान दाभोली व पूर्णानंद सेवा समितीतर्फे देण्यात येणारा ‘कुटुंब प्रमुख‘ पुरस्कार यावर्षी रत्नागिरीचे उद्योजक तथा मंत्री उदय सामंत यांचे वडील रविद्र सामंत यांना तर उदय सामंत यांच्या मातोश्री स्वरूपा सामंत यांना ‘जिजामाता पुरस्कार‘ प्रदान करण्यात आला. हा कार्यक्रम २५ मे रोजी वेंगुर्ला येथील स्वामिनी मंगल कार्यालयात पार पडला. वेंगुर्ला ही सामंत कुटुंबियांची जन्मभूमी आहे. त्यामुळे या भूमीत पाऊल टाकताना नेहमीच मन उत्साहीत असते. या जिल्ह्याचे पालकमंत्री पद भूषविताना आपला मुलगा उदय याने काही प्रमाणात या भूमीचे ऋण फेडले आहेत. पण, ऋण ते कधी फेडण्यासाठी नसतात. या भूमीच्या ऋणात आम्ही सदैव राहून इच्छितो, असे प्रतिपादन स्वरूपा सामंत यांनी केले. 

Leave a Reply

Close Menu