►पाच लाख पर्यटकांकडून ‘किल्ले सिधुदुर्ग‘ दर्शन

नव्याने उभारण्यात आलेला राजकोट येथील शिवपुतळा, मालवण शहर आणि ऐतिहासिक ‘किल्ले सिधुदुर्ग‘ पाहण्यासाठी पर्यटकांनी यावर्षी प्रचंड गर्दी केल्याचे दिसून आले. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी एक लाखाहून अधिक पर्यटकांनी किल्ले सिधुदुर्गला भेट दिल्याची अधिकृत आकडेवारी बंदर विभागाकडून जाहीर करण्यात आली आहे. २०२४-२५च्या पर्यटन हंगामात ऐतिहासिक सिधुदुर्ग किल्ला पाहण्यासाठी ५ लाख १५ हजार ८०६ पर्यटकांनी हजेरी लावली. यंदाची आकडेवारी पाहता, यंदाचा हंगाम पर्यटन व्यावसायीकांना दिलासा देणारा ठरला, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. अवेळी पाऊस झाला नसता, तर आकडेवारीने साडेपाच लाखांचा टप्पा पार केला असता.

Leave a Reply

Close Menu