गुर्मित गरहा ग्रुमिग स्कूल नवीमुंबई तर्फे जुईनगर येथे घेतलेल्या मिस, मिसेस आणि मिस्टर इंडिया या मानाच्या स्पर्धेमध्ये वेंगुर्ल्याच्या कु. किरण शरद मेस्त्री हिने ‘चार्मिंग मिस इंडिया २०२५‘ हा किताब पटकावला. या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. स्पर्धेदरम्यान किरण हिने पर्यटनदृष्ट्या बदलत्या वेंगुर्ल्याची खास ओळख करून दिली. स्पर्धेचे परीक्षण अमर सोनवणे, सुंदर अलेक्झेंडर, सूरज कुमार, स्वीकृती श्रीवास्तव, फरहान रमझान यांनी केले.