जिल्हा परिषद किवा पंचायत समिती स्तरावर दिव्यांग बांधवांची निश्चित आकडेवारी उपलब्ध नसल्याने जिल्हातील दिव्यांग बांधवांना जिल्हापरिषद, पंचायत समिती तसेच ग्रामपंचायत स्तरावरील उपकर निधीमधून विविध योजनांमधून स्वयंरोजगारासाठी किवा अन्य कारणांसाठी आर्थिक सहाय्य देताना मोठी समस्या निर्माण होत होती. यावर मात करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावरून गावागावातील दिव्यांगांची माहिती संकलित करण्याची विशेष मोहिम राबविण्यात आली होती. या मोहिमेंतर्गत उपलब्ध झालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात आठ तालुक्यात मिळून एकूण ७ हजार ८२६ एवढे दिव्यांग बांधव असल्याचे निश्चित झाले आहे. वेंगुर्ला तालुक्यामध्ये अस्थिव्यंग-३३४, अंध-६९, कर्णबधीर-४५, मूकबधीर-२४, पोलिओ-०, अर्धांगवायू-११, मतिमंद-२०२, अन्य ११ असे मिळून एकूण ६९६ एवढे दिव्यांग बांधव आहेत.