महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशन, मुंबईमार्फत २०२३-२४ करीता दिला जाणारा कै.वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुरस्कार कोकण विभागातून सिधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला प्राप्त झाला आहे. महाराष्ट्रातील जिल्हा बँकांसाठी हा मानाचा पुरस्कार समजला जातो.
जिल्हा बँकेच्या पारदर्शक कारभारामुळे जिल्हावासीयांच्या मनात विश्वासाचे नाते तयार झाले असून जिल्ह्याच्या विकासामध्ये सिधुदुर्ग बँकेचा सिहाचा वाटा आहे. बँकेस मिळालेल्या या पुरस्कारामुळे बँकेने साधलेली सर्वांगिण प्रगती पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे, अशी प्रतिक्रिया जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी व्यक्त केली.