वटपौर्णिमेचे औचित्य साधून वटवृक्षाचे महत्त्व सर्वांपर्यंत पोहोचावे या हेतूने जिल्हाधिकारी कार्यालय सिधुदुर्ग येथे आगळ्यावेगळ्या वटपौर्णिमा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित महिला अधिकारी व कर्मचारी यांना वटवृक्षाच्या रोपाचे वाटप केले. झाडांच्या फांद्या तोडून पर्यावरणाचे संतुलन बिघडविण्यापेक्षा प्रत्येकाने वृक्षाची लागवड करून त्याची काळजी घेऊन त्याचे संवर्धन करत पर्यावरण रक्षणास हातभार लावणे आजची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात तसेच सिधुदुर्गनगरी प्राधिकरण क्षेत्रात जिल्हाधिकारी यांच्या पत्नी सुनिता पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.