लेखिका सौ. स्नेहा समीर राणे यांनी साहित्य क्षेत्रात केलेल्या सुमारे २५ वर्षांपेक्षा जास्तीच्या कामगिरीबद्दल त्यांना ‘हॉनररी डॉक्टरेट‘ ही पदवी बहाल करण्यात आली आहे. हा पदवी प्रदान सोहळा ९ जून रोजी इंटरनॅशनल सेंटर, न्यू दिल्ली येथे संपन्न झाला. स्नेहा राणे यची कविता संग्रह तसेच मालवणी कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. ही पदवी प्राप्त झाल्याबद्दल डॉ.सौ.स्नेहा राणे यांचे अभिनंदन होत आहे.