मी मंजूर केलेल्या कामांचे नारळ फोडायची काहींना सवयच ः दीपक केसरकर

वेंगुर्ला एसटी आगाराला नवीन ५ एस टी गाड्या १० जून रोजी प्राप्त झाल्या. या गाड्यांचे १२ जून रोजी आमदार दिपक केसरकर यांच्या हस्ते  लोकार्पण करण्यात आले. यावेळी सर्वप्रथम या ५ एसटी बस वेंगुर्ला आगाराला मिळण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल आमदार दीपक केसरकर यांचा शाल व श्रीफळ देऊन शिवसेनेच्या राष्ट्रीय कर्मचारी सेना या वेंगुर्ला एसटी संघटनेच्यावतीने सत्कार करण्यात आला.

     वेंगुर्ला तालुक्यात उंच सखल भाग असल्याने एसटी गाड्या चढायला अडचण होते. त्यामुळे डिझेलच्या एसटी गाड्या वेंगुर्ला डेपोला द्या अशी मागणी येथील एसटी कर्मचारी संघटनेने केली होती. त्याप्रमाणे ५ डिझेल एसटी गाड्या डेपोला दिलेल्या आहेत. अजून ५ गाड्यांची मागणी आगार व्यवस्थापकांनी केली आहे. याबाबत मंत्री सरनाईक यांना भेटून ती मागणी सुद्धा पूर्ण केली जाईल. अत्याधुनिक एसटी डेपो तयार करण्याचे निर्देश आहेत. लवकरच याबाबत मुंबईत बैठक होईल असे केसरकर म्हणाले.

    यावेळी एसटी आगार व्यवस्थापक राहुल कुंभार, सेनेचे नितीन मांजरेकर, सुनिल डुबळे, उमेश येरम, सुनिल मोरजकर, हर्षद डेरे, स्वप्निल गावडे, दिशा शेटकर, अॅड.श्रद्धा बाविस्कर, शाबाना शेख, मनाली परब, काशिनाथ नार्वेकर, कौशिक परब, बाळा दळवी, अमित गावडे, संजय परब, संजय गावडे, सत्यवान साटेलकर, राजू परब तसेच भाजपाचे पपू परब, दिलीप गिरप, सुहास गवंडळकर, दादा कुबल, वसंत तांडेल, दादा केळुसकर, सायमन आल्मेडा, मनवेल फर्नांडिस, प्रणव वायंगणकर यांच्यासह एसटी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

  उबाठाच्यावतीने १० जून या एसटी लोकार्पण कार्यक्रम केला. यावर मी मंजूर केलेल्या कामांची नारळ फोडायची काहींना सवय असल्याचा  टोला श्री.केसरकर यांनी उबाठावर लगावला. एसटीमध्ये शिवसेना व भाजपच्या संघटना आहेत. कर्मचा­यांना न्याय देण्याची भूमिका आहे.

Leave a Reply

Close Menu