रेल्वे इंजिन चालविणाया चालकाला लोको पायलट असे संबोधले जाते. भारतीय रेल्वेमधील एक अत्यंत महत्त्वाचे आणि जबाबदारीने परिपूर्ण असलेले हे पद आहे. आरआरबीतर्फे नुकत्याच घेण्यात आलेल्या लोको पायलट परीक्षेत होडावडे-कस्तुरबावाडीचा सुपुत्र आशिष अशोक होडावडेकर याने यश संपादन केले असून त्याची असिस्टंट लोको पायलट म्हणून तात्काळ नियुक्तीही झाली आहे. प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यानंतर तो नियमित लोको पायलट म्हणून कार्यरत राहणार आहे. कोकण रेल्वेची कठीण समजली जाणारी महत्त्वपूर्ण लोको पायलट परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल आशिष याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.