मुक्ता केळकर हिचे बीएएमएसमध्ये यश

वेंगुर्ला येथील मुक्ता कृष्णाजी केळकर ही गोवा विद्यापीठाच्या बीएएमएस अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाच्या परीक्षेत गोमंतक आयुर्वेदिक महाविद्यालय शिरोडा-गोवा येथून संस्कृतमध्ये विशेष श्रेणी आणि पदार्थ विज्ञान आणि क्रियाशरीर आणि संहितेत प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण झाली आहे.   कु. मुक्ता ही वेंगुर्ला होमिओपॅथीक मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ.के.जी.केळकर यांच्या कन्या असून तिला प्राचार्य डॉ.अनुरा बाळे, डॉ. समिर सर, कृष्णा सर, क्षिप्रा मॅडम, कापडी मॅडम, डॉ.कोरडे सर, डॉ.महेश सर, डॉ.विजय सर, डॉ.मोहंती मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र तिचे अभिनंदन होत आहे.

 

Leave a Reply

Close Menu