वेंगुर्ला-मालवण रस्त्यावर कोसळली दरड

13 जूनच्या रात्री कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे वेंगुर्ला – मालवण सागरी महामार्गावरील दाभोली येथे फॅक्टरीजवळ मुख्य रस्त्यावर दरड कोसळली. सुदैवाने यावेळी वाहतूक नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे. वेंगुर्ला गुड मॉर्निंग ग्रुप त्या मार्गाने सकाळी जात होता. त्यांनी ही कोसळलेली दरड पहिली आणि सामाजिक बांधिलकी जपत या ग्रुपमधील बाळा परूळेकर, नवीन भोने, संजय वैद्य, प्रशांत नेरूरकर, सेजल भाटकर, विक्रम घाडी, प्रकाश भानुषाली, राजा रेडकर, आनंद बोवलेकर, मिलिंद शिवलकर, संतोष साळगावकर, संजय भाटकर यांनी एका बाजूने काही दगड बाजूला करून लहान गाड्यांसाठी रस्ता मोकळा केला. सार्वजनिक बांधकाम विभागाला या घटनेबाबत माहिती मिळताच त्यांनी जेसीबीच्या सहाय्याने दरड बाजूला करून वाहतुकीस मार्ग मोकळा केला.

Leave a Reply

Close Menu