शिक्षण घेऊन केवळ नोकरी करणे हे उद्दिष्ट आता कालबाह्य झाले आहे. सध्याच्या युगात टिकून राहायचे असेल, वर्चस्व मिळवायचे असेल, तर आधुनिक तंत्रज्ञान प्रणाली आत्मसात करा. त्यामध्ये प्राविण्य मिळवा. उद्योगधंद्यांमध्ये बस्तान बसवून उद्योजक बना, असे आवाहन सारस्वत को-ऑप. बँकेचे संचालक सुनील सौदागर यांनी विद्यार्थ्यांना केले.
वेंगुर्ले येथील स्वामिनी मंगल कार्यालयात गौड सारस्वत ब्राह्मण समाज, तालुका वेंगुर्ला आयोजित समाजातील दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. सौदागर बोलत होते.
या गुणगौरव सोहळ्याची सुरूवात दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी वेंगुर्ले तालुका गौड सारस्वत ब्राह्मण समाज संघटनेच्या अध्यक्ष सुजाता पडवळ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. या प्रसंगी संजय पुनाळेकर यांनी संस्थेने केलेल्या कार्याचा आढावा घेतला.
या सोहळ्यात 18 विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, भेटवस्तू आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. समर्थ भिसे, सोहम कमलेश सामंत, आर्य अमेय प्रभू-खानोलकर, लक्षणा मंगेश नाबर, जयराम दत्तप्रसाद प्रभू, अथर्व सुनील तेंडोलकर, श्रेया विक्रम तिरोडकर, मधुर आनंद नाईक, स्नेहा मंगेश नाईक, वैष्णवी रवींद्र प्रभू-खानोलकर, हर्षदा मधुसूदन प्रभू, दुर्वेश मंगेश पंडित, गोपाळ शामसुंदर राय, मयुरेश सखाराम सौदागर, प्रसन्ना गोपाळ दाभोलकर, गायत्री पुरुषोत्तम नाईक, उज्ज्वल दामोदर सामंत, दुर्वाक्षी यशवंत प्रभू खानोलकर आणि स्वामी पुरुषोत्तम नाईक यांना गौरविण्यात आले.
यावेळी पालकांतर्फे डॉ. अश्विनी माईणकर-सामंत यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांतर्फे दुर्वेश मंगेश पंडित यांनी मनोगत व्यक्त केले.
सूत्रसंचालन संजय पुनाळेकर यांनी केले. अमोल प्रभू झांटये यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुधीर झांटये, दिगंबर नाईक, अमोल खानोलकर, अमोल आरोसकर, प्रकाश रेगे, डॉ. प्रसाद प्रभू-साळगावकर, सीमा नाईक, तृप्ती आरोसकर, राखी दाभोलकर, ॲड. सुषमा प्रभू-खानोलकर यांनी परिश्रम घेतले.