संकटांवर मात करीत सचिन बनला पखवाज विशारद

वेंगुर्ला-वडखोल येथील रहिवासी आणि जन्मःताच अंध असलेल्या वेंगुर्ला संगीत भूषण सचिन भालचंद्र पालव या युवकाने एप्रिल-मे २०२५ मध्ये झालेल्या पखवाज विशारद पूर्ण परीक्षेत यश मिळविताना प्रथम श्रेणी मिळविली आहे. त्यासाठी सचिन याला निलेश पेडणेकर व मनिष तांबोसकर यांचे मार्गदर्शन लाभले. यापूर्वी तो तबलाहार्मोनियम व गायन क्षेत्रात विशारद झाला आहे. आता पखवाज विशारद होऊन चारही क्षेत्रात त्याने प्राविण्य प्राप्त केले आहे. संगीत क्षेत्रात विशारद होत असतानाच सचिन याला अचानक किडणीचा त्रास जाणवू लागला. उपचारासाठी येणारा खर्च उचलणे घराच्यांना शक्य नसल्याने समाजातील नागरिकांनी त्यासाठी आर्थिक सहाय्य केले. आलेल्या संकटांवर मात करीत सचिनने पखवाज विशारद पदवी प्राप्त केली.  या यशाबद्दल सचिन याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Close Menu