गाबित समाज समस्या निवारण मेळावा संपन्न

वेंगुर्ला नगरपरिषदेच्या स्वामी विवेकानंद सभागृहात गाबित समाज समस्या निवारण मंचचे सदस्य तथा वेंगुर्ल्याचे माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या पुढाकाराने वेंगुर्ला तालुका गाबित समाज व गाबित समाज समस्या निवारण मंच यांच्या माध्यमातून समाजाच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी मार्गदर्शन मेळावा घेण्यात आला. यावेळी गाबित समाज समस्या निवारण मंचचे संस्थापक अध्यक्ष सुनिल जोशी, संस्थापक सखाराम मालंडकर, अवधूत मालंडकर, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, गणेश फडके, शंकर पोसम, बाबा नाईक, दादा केळुसकर, सूर्यकांत खवळे, काका मुणगेकर आदी उपस्थित होते.

   समाजाच्या विकासासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याची गरज होती. त्यावेळी संघटितपणे ती केली गेली नाही. गाबित समाज समस्या निवारण मंचची स्थापना केली आहे. समाजाच्या विकासासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन साथ देऊया, असे प्रतिपादन सुनिल जोशी यांनी करत विविध योजनांची माहिती दिली. मेळाव्यात सुनिल जोशी, सखाराम मालंडकर, शंकर पोसम, जिल्ह्याचा आदर्श पुरस्कार प्राप्त भरत सातोस्कर, स्वामिनी महिला बचत गटाच्या आयेशा हुले यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन वसंत तांडेल यांनी तर आभार गणेश फडके यांनी मानले.

 

Leave a Reply

Close Menu