बावडेकर विद्यालय मुख्याध्यापकपदी आबा कांबळी

आरवलीतील श्री देव वेतोबा देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान खजिनदार मंगेश उर्फ आबा कांबळी यांची शिरोडा येथील अ.वि.बावडेकर विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी बढतीने नियुक्ती झाली आहे. त्याबद्दल वेतोबा देवस्थान समितीतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष जयवंत राय, सचिव आबा टांककर, विश्वस्त डॉ.प्रसाद साळगांवकर व माजी सरपंच मयुर आरोलकर आदी उपस्थित होते. त्यांच्या निवडीने शाळेच्या नावलौकिकात व प्रगतीत निश्चितच भर पडेल, असे मत जयवंत राय यांनी व्यक्त केले. दरम्यान, विद्यालयातर्फे माजी आमदार शंकरभाई कांबळी यांच्या हस्ते आबा कांबळी यांचा सत्कार करण्यात आला. या निवडीबद्दल सर्वस्तरांतून आबा कबळी यांचे अभिनंदन होत आहे.

 

 

 

 

Leave a Reply

Close Menu