वेंगुर्ला आयटीआय : कौशल्याधारित अभ्यासक्रमातून रोजगार निर्मितीची संधी

  कोकणातील निसर्गरम्य वेंगुर्ला परिसरात शिक्षण आणि रोजगाराच्या संधी मर्यादित असताना, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वेंगुर्ला (सिंधुदुर्ग) ही स्थानिक युवक-युवतींसाठी उज्ज्वल भविष्याची दिशा दाखवणारी संस्था ठरली आहे. ‌‘डिग्रीपेक्षा कौशल्य अधिक महत्त्वाचं‌’ या आधुनिक विचाराशी सुसंगत अशा वेंगुर्ला कॅम्प म्हाडा कॉलनी येथील या आयटीआयमध्ये अनेक व्यावसायिक कोर्सेस (ट्रेड्स) उपलब्ध आहेत, जे अल्पावधीत आणि कमी खर्चात निश्चित करिअर घडवतात.

सध्या उपलब्ध ट्रेड्स, शिक्षण आणि संधी

      वेंगुर्ला आयटीआयमध्ये 10वी पास किंवा नापास विद्यार्थ्यांसाठी खालील अभ्यासक्रम चालू आहेत:

ट्रेडचे नाव व उपलब्ध जागा – Wood Work Technician (सुतारकाम), Dress Making (ड्रेस मेकिंग)      16+4 (IMC), Welder (संधाता) 32+8 (IMC), Electrician (विजतंत्री) 16+4 (IMC), Wireman (तारतंत्री) 16+4 (IMC), ICTSM –    Information & Communication Technology System Maintenance 19+5 (IMC), Total : 124

IMC-Institute management committee – संस्था विकासासाठी शासन (गव्हर्नमेंट) आणि खाजगी संस्था (प्रायव्हेट इंडस्ट्री) च्या  सहभागातून तयार  केलेली कमिटी.

      हे सर्व कोर्सेस प्रत्यक्ष कौशल्यावर आधारित असून, प्रवेशासाठी https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावा लागतो.

      विजतंत्री (इलेक्ट्रीशियन) व तारतंत्री (वायरमन) हे कोर्सेस शासनाच्या वीजवितरण, विद्युत निर्मिती, विद्युत पारेषण (वहन) विभाग, घरगुती, औद्योगिक वायरिंग, विद्युत उपकरणे दुरुस्ती यामध्ये रोजगारक्षम ठरतात. अनेक विद्यार्र्थ्यांनी या प्रशिक्षणाचा उपयोग करून आपलं गॅरेज, शिलाई सेेंटर, व्‌ि‍द्युत उपकरणे दुरूस्ती तसेच वायरिंग कामाचे दुकान सुरू केले आहे.

पुरेशी विद्याथ संख्या आवश्यक-

      अनेकदा विद्यार्थ्यांच्या अभावामुळे उपलब्ध असलेले कोर्सेस बंद होतात किंवा इतर ठिकाणी हलवले जातात. याचेच एक उदाहरण म्हणजे पूव वेंगुर्ला आयटीआयमध्ये सुतारकाम (Carpentry) ट्रेड उपलब्ध होता, परंतु पुरेशा विद्यार्थ्यांची संख्या न झाल्यामुळे हा कोर्स आता सावंतवाडी आयटीआय येथे स्थलांतरित करण्यात आला आहे.

      ही बाब अत्यंत विचार करण्यासारखी आहे. जर स्थानिक तरुणांनी या सुवर्णसंधीकडे पाठ फिरवली, तर भविष्यात इतर कोर्सेस देखील बंद पडण्याची शक्यता असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अधिकाधिक संख्येने प्रवेश घ्यावा, सहभागी व्हावे आणि आपल्याच भागातील कौशल्याधारित शिक्षण व संधी जपाव्यात, ही काळाची गरज आहे.

प्रत्येक कोर्समागचं व्यावसायिक महत्त्व

      ड्रेस मेकिंग कोर्समधून महिलांसाठी बुटीक, शिलाई व्यवसाय, घरबसल्या उत्पन्न अशा अनेक शक्यता निर्माण होतात. वेल्डर हा कोर्स बांधकाम, शिपिंग, रेल्वे अशा क्षेत्रात कायमची मागणी असलेली कौशल्ये देतो. इलेक्ट्रिशियन व वायरमन हे कोर्सस वीजवितरण, दुरुस्ती, घरगुती व औद्योगिक वायरिंग यामध्ये रोजगारक्षम ठरतात. ICTSM कोर्समधून संगणक हार्डवेअर, नेटवर्किंग, डिजिटल मेंटेनन्स यामध्ये करिअर घडवता येतं.

      हे सर्व कोर्स फक्त नोकरी मिळवण्यासाठी नव्हे, तर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठीदेखील बळ देतात. अनेक विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणाचा उपयोग करून आपलं गॅरेज, शिलाई सेंटर, रिपेअरिंग दुकान सुरू केलं आहे.

शिक्षणात गुणवत्ता आणि मार्गदर्शन-

      वेंगुर्ला आयटीआयमध्ये अनुभवी, समर्पित आणि कौशल्यावर विश्वास ठेवणारे शिक्षक व प्रशिक्षक कार्यरत आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याला केवळ पुस्तकात अडकवून ठेवण्याऐवजी, प्रत्यक्ष हाताळणी, प्रात्यक्षिके, कार्यशाळा यावर भर दिला जातो. मार्गदर्शक शिक्षणासोबत शिस्त, नियमितता आणि व्यावसायिक दृष्टिकोनही विकसित करतात.

कौशल्याधारित शिक्षण  काळाची गरज

      आजची तरुणाई फक्त ‌‘शिकून काहीतरी व्हावं‌’ एवढ्यावर थांबत नाही, तर ‌‘शिकून स्वतः काहीतरी करावं‌’ असा दृष्टीकोन बाळगते. त्यासाठी आयटीआय हे उत्तम व्यासपीठ आहे. केवळ पदवी नव्हे, तर प्रत्यक्ष कामासाठी लागणारी ज्ञान आणि हातात कौशल्य देणारी ही व्यवस्था शाश्वत रोजगाराची दिशा देते. वेंगुर्ला आयटीआय ही केवळ एक प्रशिक्षण संस्था नाही, तर स्वाभिमानाने जगण्याची, कुटुंबाला हातभार लावण्याची आणि समाजात उपयोगी ठरण्याची संधी आहे.

      विद्यार्थ्यांनी यामध्ये सक्रीय सहभाग घेतल्यास, उपलब्ध संधी जपल्या जातील आणि भविष्यात त्याहून अधिक अभ्यासक्रम सुरू होण्याचा मार्ग मोकळा होईल.

शब्दांकन – सीमा शशांक मराठे
9689902367

चौकट

1) व्यवसाय : वीजतंत्री, पात्रता : 10 वी पास, संधी : शासकीय/खाजगी विद्युत आस्थापना तसेच स्वयंरोजगार करण्यासाठी उपयुक्त

2) व्यवसाय : वेल्डर (संधाता), पात्रता : 10 वी पास/नापास,  संधी : सर्व शासकीय /खाजगी कारखाने/तांत्रिक आस्थापना तसेच स्वयंरोजगार करण्यासाठी उपयुक्त.

3) ICTSM :  पात्रता : 10 वी पास, संधी : शासकीय/खाजगी  संगणक  इलेक्ट्रॉनिक्स आस्थापना तसेच स्वयंरोजगार करण्यासाठी उपयुक्त.

4) वायरमन (तारतंत्री) : पात्रता : 10 वी पास/नापास, संधी : सर्व शासकीय/खाजगी विद्युत आस्थापना तसेच स्वयंरोजगार करण्यासाठी उपयुक्त..

5) ड्रेस मेकिंग : पात्रता 10 वी पास, संधी : शासकीय/खाजगी आस्थापना तसेच स्वयंरोजगार करण्यासाठी उपयुक्त.

Leave a Reply

Close Menu