पिंपळाच्या पानावर साकारला पंढरीचा विठूराया

      आषाढी एकादशीचे औचित्य साधून दाभोली येथील कु. मयंक विनायक दाभोलकर याने पिंपळाच्या पानावर विविध रंगाच्या सहाय्याने पंढरीचा विठूराया साकारला आहे. त्याच्या कलेबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. कु. मयंक हा दाभोली इंग्लिश स्कूलचा इयत्ता दहावीचा विद्याथ आहे. तो उत्कृष्ट हार्मोनियम वादक म्हणून दाभोली गावामध्ये प्रसिद्ध असून नाट्य कलावंतसुद्धा आहे. दरम्यान, त्याने पिंपळाच्या पानावर रेखाटलेल्या विठ्ठलाच्या चित्राबाबत दाभोली इंग्लिश स्कूलमध्ये त्याचे कौतुक करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Close Menu