भाजपातर्फे गुरूपौर्णिमेनिमित्त गुरूजनांचा विशेष सत्कार

गुरूपौर्णिमेचे औचित्य साधून समाजात ज्ञानाचा प्रकाश पसरवणा­या आणि निष्ठापूर्वक कार्य करणारे सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक तथा संघाचे स्वयंसेवक अनंत आठले गुरूजी तसेच डॉ.वामन कशाळीकर यांचा वेंगुर्ला भाजपाच्यावतीने त्यांच्या निवासस्थानी जाऊन कृतज्ञता व्यक्त करीत विशेष सत्कार करण्यात आला.

     यावेळी भाजपाचे सुहास गवंडळकर, रवी शिरसाठ, वसंत तांडेल, सुजाता पडवळ, अॅड.सुषमा प्रभूखानोलकर, वृंदा गवंडळकर, प्रार्थना हळदणकर, साक्षी पेडणेकर, आकांक्षा परब, रसिका मठकर, प्रणव वायंगणकर, हेमंत गावडे, पुंडलिक हळदणकर आदी उपस्थित हते. अनंत आठले हे भाजपाचे निष्ठावान कार्यकर्ते असून त्यांनी शिक्षक म्हणून काम करत असतानाच आपले आयुष्य समाजसेवेत आणि राष्ट्रनिर्माणासाठी घालवले आहे. तर डॉ. कशाळीकर यांनी आरोग्य सेवेत मोलाचे योगदान देताना भगवद्गीतेच्या पाठांतरासाठी त्यांना करवीर पीठाच्या शंकराचार्यांकडून सन्मानित करण्यात आले आहे.

Leave a Reply

Close Menu