गुरूपौर्णिमेचे औचित्य साधून विद्याभारती संचलित वेतोरे येथील ज्ञानदा शिशूवाटिकेतील मुलांनी आपल्या आईची पाद्यपूजा करून अनोखी गुरूपौर्णिमा साजरी केली. शिशूवाटिकेच्या संचालिका कांचन दामले यांनी मुलांवर चांगले संस्कार होण्यासाठी आपले चालीरीती, परंपरा या घरातच कसे जपावे याचे मार्गदर्शन केले.