दिव्यांग महिलांच्या निबंध स्पर्धेत कल्पना दबडे प्रथम

             वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग,तुळस आणि कै. गणेश लक्ष्मण दाभोलकर मेस्त्री सांस्कृतिक मंच, दाभोली यांच्या संयुक्त विद्यमाने ‘माझी कहाणी-माझा आत्मसन्मान‘ या विषयावर दिव्यांग महिलांसाठी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत सांगली येथील कल्पना उत्तम दबडे यांनी प्रथम क्रमांक  पटकाविला. या स्पर्धेत राज्यभरातून एकूण २६ निबंध प्राप्त झाले होते. स्पर्धेत शैलजा चंद्रकांत पांढरे (आजगांव-सिधुदुर्ग)-द्वितीय, समिक्षा अंकुशराव बोबडे (अमरावती)-तृतीय, तर सामिना आबू शेख (सातारा) आणि प्राजक्ता सुरेश माळकर (सिधुदुर्ग-तुळस) यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकाविले. स्पर्धेचे परीक्षण प्रा.पी.आर.गावडे यांनी केले. लवकरच विजेत्यांना रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचे आयोजकनी सांगितले आहे.

Leave a Reply

Close Menu