गाबीत समाजाचा विद्यार्थी गुणगौरव

वेंगुर्ला तालुका गाबित समाज संस्थेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा १९ जुलै रोजी वेंगुर्ला नगरपरिषदेच्या स्वामी विवेकानंद सभागृहात संपन्न झाला. यावेळी समाजातील दहावी, बारावी व पदवी, पदव्युत्तर परीक्षेतील गुणवंत अशा एकूण ६० विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी इंडिगो विमान कंपनीचे मॅनेजर गणेश कांबळी, गाबीत समाजाचे अध्यक्ष दिलीप गिरप, स्टेट बँकेचे निवृत्त मॅनेजर दिलीप गिरप, बाबा नाईक, मनोज उगवेकर, श्वेता हुले, दादा कुबल, प्रमुख मार्गदर्शक मानव संसाधन संस्थेचे नंदकिशोर परब, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे केंद्र संयोजक राजेश मोंडकर उपस्थित होते.

     सोशल मीडियावर रिल्सचे हिरो बनण्यापेक्षा रिअल हिरो बना, असे आवाहन गणेश कांबळी यांनी केले. वर्तमानपत्रांचे अनॅलिसिस करायला शिका असे नंदकिशोर परब यांनी सांगितले. दिलीप गिरप यांनी समाज बांधवांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.

    वेंगुर्ला न.प.ने स्वच्छता अभियानात कोकणात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल स्वच्छता निरीक्षक प्रविण कांबळे, सफाई कर्मचारी राजश्री वराडकर यांचा प्रातिनिधिक सत्कार तसेच नंदकिशोर परब, दिलीप गिरप, गणेश कांबळी, राजेश मोंडकर, पत्रकार आबा खवणेकर यांचाही सत्कार करण्यात आला. बारावीच्या विद्यार्थ्यांना बापू गिरप लिखित ‘स्वयंविकासाच्या वाटेवर‘ हे पुस्तक भेट देण्यात आले. सूत्रसंचालन व आभार बाबुराव खडपकर यांनी केले.

Leave a Reply

Close Menu