कॅन्सर व्हॅनच्या माध्यमातून २८६ जणांची तपासणी

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे राष्ट्रीय आरोग्य अभियानांर्गत वेंगुर्ला उपजिल्हा रूग्णालयात आयजित कर्करोग तपासणी आणि जनजागृती मोहिमेला रूग्णांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अत्याधुनिक कॅन्सर व्हॅनच्या माध्यमातून डॉ.एच.के.मणेर, डॉ.गणेश मर्ढेकर, ऋचा प्रभू, योगेश कांबळे, राजेश पारधी, संतोष खानविलकर, रजत जोशी, नेहा पडते, शिल्पा दळवी, महादेव हिगले, सुनिल धोपावकर यांनी २८६ रूग्णांची मौखिक, गर्भाशय ग्रिवा आणि स्तनाच्या कर्करोगासाठी तपासणी, स्क्रिनिग आणि समुपदेशन केले. या मोहिमेचा शुभारंभ जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी व शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्या हस्ते झाला. यावेळी पपू परब, संजय गावडे, डॉ.संजिव लिगवत, रोटरी क्लबचे वरिष्ठ पदाधिकारी राजेश घाटवळ, रोटरी क्लब वेंगुर्ला मिडटाऊनचे अध्यक्ष आनंद बोवलेकर, उपाध्यक्ष अॅड.प्रथमेश नाईक, किरण कुबल, कार्मिस आल्मेडा, किरण खानोलकर, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा अपर्णा बोवलेकर, माजी अध्यक्षा वृंदा गवंडळकर, आकांक्षा परब उपस्थित होते.

      शिबिर यशस्वी होण्यासाठी उपजिल्हा रूग्णालयातील वैद्यकीय अधिक्षक डॉ.संदिप सावंत, डॉ.निखिल बोड्डावार, परिसेविका श्रीनिधी घाटवळ, डॉ.अमोल गबाळे, डॉ.शुभम धारगळकर, डॉ.किरण कुंटे, डॉ.सत्यम आगलावे, फार्मसी अधिकारी दिनेश राणे, अनुजा मोरे, प्राजक्ता मोरजकर, मंगल पवार, प्रियांका कारिवडेकर, समिक्षा पारकर, अस्मिता वराडकर यांच्यासह राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे डॉ.सुप्रिया रावळ, डॉ.महादेव मुंडे, श्याम चव्हाण, संजना मोचेमाडकर, तनुश्री नाईक आदींनी परिश्रम घेतले.

     शिबिराला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले. यावेळी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.सुबोध इंगळे, वैद्यकीय अधिक्षक डॉ.संजय पोळ, डॉ.बालाजी पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुधीर धनगे, समन्वयक केतन कदम आणि संतोष खानविलकर उपस्थित होते.

 

Leave a Reply

Close Menu