उभादांडा-सिद्धेश्वरवाडी येथील प.पू.आई नरसुले यांची ४०वी पुण्यतिथी २१ जुलै रोजी विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांनी संपन्न झाली. यावेळी प.पू.आई नरसुले यांच्या जीवनावर आधारीत प्रकाशित करण्यात आलेल्या पुस्तकाचे प्रकाशन विलास दळवी व अन्य मान्यवरांच्या हस्ते झाले. तत्पूर्वी सकाळी काकडा, अभिषेक, ह.भ.प.सावळाराम कुर्ले बुवा यांचे कीर्तन, आरती व महाप्रसाद त्यानंतर जिल्हास्तरीय नाट्य स्पर्धेत स्त्री अभिनायात प्रथम क्रमांक पटकाविलेल्या वैभवी विठ्ठल सोकटे, सिधुकिरण दिनदर्शिकेचे चंद्रहास उकिडवे तसेच दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा तसेच हरिश्चंद्र मांजरेकर, तुकाराम कापडोसकर, गंगाराम नवार, आनंद केरकर, रामदास आरोलकर, राऊळ सर, तुषार कामत, विलास दळवी, प्रा.महेश बोवलेकर यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. तर भरत सातोस्कर, दाजी नाईक, प्रथमेश गुरव, योगेश तांडेल यांना पत्रकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी व्यासपिठावर आई नरसुले समाधी मंदिराचे व्यवस्थापक मोहनदास नरसुले, सामाजिक कार्यकर्ते विलास दळवी, माजी गटशिक्षणाधिकारी रमेश पिगुळकर, विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष गजानन नरसुले आणि समृद्धी नरसुले आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.महेश बोवलेकर यांनी केले. रात्री स्थानिक मंडळांची भजने संपन्न होऊन पुण्यतिथी उत्सवाची सांगता झाली.