उभादांडा न्यू इंग्लिश स्कूलमधील मार्च २०२५च्या शालांत परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक शिक्षकांचा गुणगौरव समारंभ १८ जुलै रोजी सिधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, समाजकल्याणचे माजी सभापती अंकुश जाधव व न्यू एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन विरेंद्र कामत-आडारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यश मिळवलं पाहिजे ही जिद्द या स्कूलच्या संस्था चालकांसोबतच इथल्या शिक्षकांच्याही रक्तात आहे आणि तिच प्रेरणा इथल्या विद्यार्थ्यांनी घेतलेली दिसते. म्हणून या शाळेचे विद्यार्थी हे शालेय उपक्रमांबरोबरच विविध स्पर्धांमध्ये यश मिळवित आहेत. संस्थेने केलेल्या सगळ्या संघर्षाचे एक चांगले फलित त्यांना मिळवून देणारे असल्याचे मनीष दळवी यांनी सांगितले.
माजी सभापती अंकुश जाधव यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी मोबाईलचा सदुपयोग करावा दुरूपयोग करू नये. शिक्षकांच्या सल्ल्यानुसार शिक्षणात प्रगती करावी असा सल्ला दिला. बक्षिस ठेव योजनेतून दहावीच्या परीक्षेतील उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा तर मुलांना अध्यापनाचे धडे देणाया शिक्षकांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी परबवाडा उपसरपंच पपू परब, संस्थेचे सेक्रेटरी रमेश नरसुले, आत्माराम गावडे, शिक्षक तज्ज्ञ रमेश पिगुळकर, राधाकृष्ण मांजरेकर, शिवराम आरोलकर, सुजित चमणकर, निलेश मांजरेकर, दाजी नाईक आदी उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक उमेश वाळवेकर यांनी केले. शैक्षणिक आढावा दिपक बोडेकर यांनी घेतला. अश्वमी भिसे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांची माहिती दिली. सूत्रसंचालन व आभार वैभव खानोलकर यांनी मानले.