कटू आठवणींसह काळा दिन साजरा

शिरोडा-वेळागर येथे २९ वर्षांपूर्वी झालेला रक्तरंजित संघर्ष आजही ताजा आहे. या आंदोलनातील कटू आठवणी वेळागरवासीयांनी हा दिवस ‘काळा दिवस‘ म्हणून पाळून आजही ताज्या ठेवल्या आहेत. २२ जुलै रोजी संघर्ष समितीचे अध्यक्ष आजू आमरे यांच्या निवासस्थानी भूमिपूत्रांनी एकत्र येत या दिवसाच्या कटू आठवणींसह काळा दिन साजरा केला. यावेळी सर्व्हे नंबर ३९ लढ्याचे नेते जयप्रकाश चमणकर, संघर्ष समितीचे उपाध्यक्ष आग्नेल सोझ, आबू आरोसकर, नेल्सन सोझ, आश्विन मयेकर, फास्कोल फर्नांडीस, अब्रास मेनास, मदन आमरे, आबा चिपकर, दीपा आमरे आदी उपस्थित होते.

    शिरोडा-वेळागर येथे २२ जुलै १९९६ रोजी घडलेला प्रसंग आजही अंगावर काटा उभा करतो. वेळागरची जमीन गिळंकृत करण्यासाठी आलेल्या सर्वेअरना रोखणा­या स्थानिक भूमिपूत्रांना सरकारी यंत्रणेने जेरीस आणले. पण, संघर्ष समिती झुकली नाही. सरकारकडून झालेला अमानुष लाठीचार्ज आपल्या अंगावर झेलत वेळागरवासीयांनी हे अतिक्रमण झुगारून लावले. अनेकांचे रक्त सांडले, तेव्हाच कुठे आपल्याला न्याय मिळू लागला आहे. संघर्ष समितीच्या टोकाच्या विरोधामुळेच सर्व्हे नं.३९ हा ताजच्या प्रकल्पातून वगळण्यात येणार आहे. हा आपल्या संघटित लढ्याचाच विजय आहे, असे प्रतिपादन सर्व्हे नंबर ३९ लढ्याचे नेते जयप्रकाश चमणकर यांनी केले.

Leave a Reply

Close Menu